बरेच दिवसांपासुन या ब्लॉग वर कांही फोटॊ अपलोड करायचे होते पण कामाच्या व्यस्ततेमुळे राहुन गेले. अर्थात हे फोटो काही फार प्रोफेशनल कॅमेऱ्याने काढलेले नाहीत.माझ्या सेल फोनने काढलेले हे फोटोग्राफ्स आहेत. आजचे पोस्ट आहे त्र्यंबकेश्वर मंदिर. या मंदिराच्या शेजारीच पेशव्यांनी बांधलेला एक चौसोपी वाडा आहे. त्याच्या मोठ्य दरवाजातुन आत शिरलं की मग मात्र एका वेगळ्याच विश्वात पोहोचतो. श्रीमंत पेशव्यांनी जेंव्हा मंदिराचा जिर्णोध्दार केला तेंव्हाच हा वाडा पण बांधुन दिला असं म्हणतात. या वाड्याच्या आतुन मंदिरा मधे थेट प्रवेश घेता येतो.

हा फोटो आहे दिंडी दरवाजाचा. ( मंदिराच्या नव्हे तर शेजारच्या वाड्याच्या)

त्रयंबकेश्वराचे मंदिर

मंदिराच्या आवारातिल हत्तीं कुंड.

माधवराव पेशव्यांनी बांधुन दिलेला वाडा. हल्ली इथे मंदिराच्या ट्रस्टचे ऑफिस आहे.

मंदिरातिल पाणि तापवण्याचा बंब आणि मोठी कढई..

वाड्यामधला लाकडी जिना.. सगळा वाडा सागवानाच्या तुळ्यांवर आहे. सुंदर बांधकाम. ३०० वर्षानंतरही प्रेक्षणिय..

दर्शन झालं , आता मस्तपैकी पालकाची, कांदयाची आणि बटाट्याची भजी खावी..

स्मशानाजवळच्या पिंपळाखालचा मुंजा.आमची गाडी इथेच पार्क केली होती

त्र्यंबकेश्वराचे डॊंगर. मला पुढल्या वर्षी ब्रह्मगिरीला परिक्रमा करायची आहे. कोण कोण येणार बोला? दुसऱ्या श्रावण सोमवारी??
.
कार खाली एक लहानसं म्यांउ चं पिलु येउन बसलं होतं, ते कांही केल्या जातंच नव्हतं.
